Wednesday, October 31, 2012

छत्रपती शिवाजी महाराज


छत्रपती श्री शिवाजी महाराज म्हणजे आपला स्वाभिमान,सळसळत्या चैतन्याचा अखंड स्फुर्तिस्थान आणि अखंड हिंदुस्थानाचा सर्वोच्च मानबिंदु.जगातील संपुर्ण भाषांमधील सर्व शब्द संपतील तरीही महाराजांचे कर्तुत्व संपणार नाही एवढं मोठं व्यक्तिमत्व....
एवढं अथांग कार्य करुनही, एवढं झिजुनही आपल्या भारताच्या अनेक राज्यांच्या शासकीय पाठ्यपुस्तकात महाराजांचा उल्लेख दरोडेखोर,बागी असा केला जातो आणि आपण मात्र षंढ असल्यासारखे हातावर हात धरुन बसतो.
म्हणतात ना कि जिथे पिकतं तिथे त्याला किंमत नसते छत्रपती शिवाजी महाराजां बद्दलही असंच काहीसं आहे.परंतु काहीही केलं तरी बावनकशी सोन्याची किंमत कमी होत नाही.त्याच सोन्याची ही छोटीशी छलक...

उत्तर व्हिएतनामच (North Vietnam) २० वर्षा पासुन जगातल्या सगळ्यात
ताकदवर देश म्हणजे अमेरिका (America) सोबत युद्ध चालु होतं.
१९५५ ते १९७५. पण शेवटी २० वर्षाच्या युद्धानंतरउत्तरी विएतनाम (North Vietnam) ने
अमेरिका (America) चा पराभवकेला आणि उत्तर आणी दक्षिण विएतनाम(Vietnam) ला एकत्र केलं.
विएतनाम च्या संरक्षण मंत्री 'मादाम बिन्ह'(Madam Binh) भारतात १९७७ मध्ये आल्या.
तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री जगजीवन राम यांनी त्यांचे स्वागत केले.
आता जेव्हा पण असे विदेशी पाहुणे भारतात येतात तेव्हा भारत सरकार त्यांना 'राजघाट' 
'शांती वन','कुतुब मिनार' 'ताज महाल' वगैरे दाखवतात.
पणत्या मादाम बिन्ह(Madam Binh) नी एक वेगळीच मागणी टाकली.
त्या म्हटल्या की हे सगळं नंतर बघेल. पण सर्वात पहिले मला रायगडावर जाऊन
शिवाजी महाराजांच्या मूर्तीला हार घालुन त्यांच्या पायांना स्पर्श करायचा आहे.
मग नंतर त्यांना जेव्हा विचारलं की तुम्हाला महाराजांबद्दल इतका आदर का?
तेव्हा त्यांनी उत्तर दिलं,
''जेव्हा अमेरिका सोबत आमचं (व्हिएतनामच) युद्ध सुरू होतं
तेव्हा आमच्या सैन्यात 'Vietcong' मध्ये आमचे सैनिक शिवाजी महाराज
आणि त्यांच्या मावळ्यांच्या शौर्य गाथा सांगायचे. त्यांनी प्रचंड
मोठ्या मुघलांच्या सैन्याला कसं पराभूत केलं हे ऐकुन
आमच्या सैन्याचं मनोबल आणखी वाढलं.
आणि आपल्या देशासाठी काही केलं पाहिजे हे त्यांना कळालं.
सगळी युवा पिढी सैन्यात सामील झाली आणि मरे पर्यंत लढली. एकच
आदर्श त्यांच्या समोर होता. तो म्हणजे फक्त
शिवाजी महाराज.
त्यांना बाजी प्रभूंची शौर्य गाथा सांगितली.
त्यांना शाहिस्तेखाना बद्दल सांगितलं. 
अचुक नियोजन आणि 'गनिमी कावा' वापरल्यामुळे
आम्ही अमेरिकाला पराभूत करू शकलो.
गनिमी काव्याचे जनक सुद्धा शिवाजी महाराज आहेत.
महाराजांच्या गनिमी कावा मुळेच आमचा विजय झाला.
आणि Cuba चे शे गुवेरा(Che Guevara) आणि फिडेल कासत्रो (Fidel Castro) यांचा सुद्धा
पराभव आम्ही करु शकलो. 
म्हणुन मला अभिमान वाटतो शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा.
आणि मी नशीबवान आहे की 
रायगड बघु शकले.''

|| जय भवानी जय शिवाजी ||

Google चा वापर ऐतिहासिक माहिती शोधण्यासाठीही होतो याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी.

© अमोल पवळे

No comments:

Post a Comment